मुख्यमंत्र्यांचे सचिव आयएएस श्रीकर परदेशी यांच्याबद्दल तुम्हाला ‘या” गोष्टी माहीत आहेत का?
हॅलो जनता न्युज, मुंबई
नुकताच महायुती सरकारचा शपथ विधी सोहळा पार पडला असून यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शपथ घेतली आहे. मात्र यानंतर आता मंत्री मंडळ विस्ताराचे वेध सर्वांना लागले आहे. आधीच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीकर परदेशी हे आता मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव असतील.
आयएएस श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळ….
पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस, एमडी असे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. यवतमाळ, अकोला आणि नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. नांदेडमध्ये असताना त्यांना जलसंवर्धनासाठी पंतप्रधान पुरस्कार मिळाला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेचे ते आयुक्तही राहिले आहेत. २०१५ मध्ये पंतप्रधान कार्यालयात रुजू झाले.
ग्रामीण, नागरी, जल, कृषी, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील धोरणांची आखणी व संनियंत्रण अशी जबाबदारी त्यांनी ५ वर्षे सांभाळली. परदेशी यांनी २०२१ मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून लोकप्रशासनात पदव्युत्तर पदवी संपादन केली. जॉन्स हापकिन्स विद्यापीठाने २०२२ मध्ये त्यांना ‘मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ’ प्रदान केले आहे. त्यांना प्रशासनाच्या कामाचा खूप अनुभव असल्याचे देखील सांगितले जात आहे….
इतर महत्वाच्या बातम्या….
“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….
आमदार किशोर पाटील यांना मंत्री पद द्यावे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाची एकनाथ शिंदेकडे मागणी