हॅलो राजकारण

ब्रेकिंग न्यूज : वैशाली सुर्यवंशी यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट

हॅलो जनता, प्रतिनिधी – शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मेळाव्यानिमित्त पारोळा येथे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची वैशाली सुर्यवंशी यांनी भेट घेऊन चर्चा केली.

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली. असून अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या दणदणीत विजयाबद्दल त्यांनी सुप्रिया सुळेंच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच याप्रसंगी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंसोबत चर्चा केली.

याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांच्यासह माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, योजना पाटील यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या . 

भडगाव तालुक्यातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, किशोर आप्पाची ताकद वाढली…

बिग ब्रेकींग : विशेष पोलीस महानिरीक्षकांचा दणका, मुक्ताईनगरचे पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी निलंबित

पाचोऱ्यात अमोल शिंदेंना मोठा धक्का, शेकडो महिलांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button