संतापजनक : वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा

हॅलो जनता, पुणे – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकत कोयत्याचा धाक दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सोमवारी पहाटे ही घटना घडली असून, अज्ञातांनी भाविकांकडील दीड ते दोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे परिसरातून पंढरपूरला वेगवेगळ्या कुटुंबांतील सुमारे सात ते आठ भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली परिसरात एका हॉटेलमध्ये हे सर्व भाविक चहा पिण्यासाठी गेले. यावेळी दोन अज्ञात तरुण दुचाकीवर आले. त्यांनी भाविक्रांच्या आणि चहावाल्याच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली.
त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यातील एकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोयत्यांचा धाक दाखवत तिला फरपटत काटवनात नेले. तिथे तिला मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
💥 पालकांनो सावधान : तुमच्या मुलांना मॅगी खावू घालताय.. अगोदर ही बातमी वाचा…
धक्कादायक : रात्रीच्यावेळी घरात घुसला अन् अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, जीवे मारण्याची धमकी