रावेर तालुक्यातील भालोद येथे सामूहिक ऐकण्यात आला “मन की बात” कार्यक्रम

हॅलो जनता, भालोद (ता. रावेर) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रम “मन की बात” चा 123 वा भाग रावेर तालुक्यातील भालोद येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अत्यंत उत्साहात सामूहिकरित्या ऐकण्यात आला. या कार्यक्रमाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्यासह भालोद गावातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
“मन की बात” या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी देशवासीयांशी थेट संवाद साधतात. हा कार्यक्रम केवळ एक राजकीय उपक्रम नसून, सामाजिक परिवर्तन घडवणारा, जनतेचा सहभाग वाढवणारा आणि देशाला नवी दिशा देणारा संवाद मंच म्हणून ओळखला जातो. भालोदमध्ये पार पडलेल्या या सामूहिक ऐकण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले विचार, विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि देशाच्या विकासासाठी असलेले प्रेरणादायी संदेश सर्वांनी एकाग्रतेने ऐकले. विशेषतः युवा कार्यकर्त्यांमध्ये या कार्यक्रमामुळे नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमानंतर आमदार अमोल जावळे यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देतो. अशा कार्यक्रमांद्वारे देशातील सामान्य नागरिकांच्या भावना, विचार आणि सहभाग या सर्वांचा सन्मान केला जातो.” या कार्यक्रमावेळी भालोदमधील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या….
भडगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा संपन्न, आमदार किशोर पाटलांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान
मुक्ताईनगर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनची बैठक, संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांचे मार्गदर्शन