हॅलो सामाजिक

महिला सुरक्षा, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देणारी होळी ; गुढे गावाचा आदर्श उपक्रम

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील 

गुढे/भडगाव : होळी सण म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या संस्कारांचा विजय, असा संदेश देत गुढे गावातील गिरणाई गणेश मित्र मंडळ तर्फे यावर्षी “वाईट विचारांचे दहन होळी” हा सामाजिक उपक्रम उत्साहात व जागरूकतेच्या वातावरणात पार पडला.

पारंपरिक होळी दहनाला सामाजिक आशयाची जोड देत मंडळाने समाजातील अपप्रवृत्ती आणि घातक कृत्यांविरोधात ठाम भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विधिवत पूजन करून उपस्थित ग्रामस्थांना उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केले.

समाजात वाढत चाललेल्या गो तस्करी, बलात्कार, लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांसारख्या विकृत व धोकादायक प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करत या विचारांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यावेळी मंडळातील सदस्यांनी शांतता, बंधुता, महिला सुरक्षा, धार्मिक सौहार्द आणि कायद्याचा सन्मान यांचे महत्त्व अधोरेखित केले.

“वाईट विचारांचा त्याग करून चांगल्या संस्कारांचा स्वीकार करणे हीच खरी होळी आहे,” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमात तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. ग्रामस्थांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचारांची पेरणी होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. गुढे गावातील या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकतेचा नवा आदर्श निर्माण झाला असून, “वाईट विचारांचे दहन आणि चांगल्या संस्कारांचे रोपण” हा संदेश सर्वदूर पोहोचत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button