विधानसभा २०२४

ब्रेकिंग : रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी निश्चित…

हॅलो जनता, प्रतिनिधी (रावेर)

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असेल तरी अजून कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी हे निश्चित झालेले नाही. मात्र रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल जावळे यांनी प्रामाणिक पणे पक्षाचे काम करत केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने अमोल जावळे यांना संधी देण्याचे ठरवले आहे.

जसे अमोल जावळे हे राजकारणात सक्रिय झाले तसे रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून त्यांचे सामजिक आणि राजकीय काम सुरू आहे. दिवंगत भाजपचे नेते हरिभाऊ जावळे यांच्या संस्कारात अमोल जावळे हे मोठे झाले असून त्यांनी राजकारण करतांना समजाकरण कसे करावे हे जवळून पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत अमोल जावळे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी पक्षाने जाहीर केल्यानंतर मात्र अमोल जावळे यांनी प्रामाणिक पणे पक्ष आदेश मानून काम करायला सुरवात केली आणि रावेर यावल विधानसभा मतदारसंघासह इतर मतदासर संघातून चांगले मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळवून देण्यात मदत केली..

दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांनी केळी उत्पादकांचे प्रश्न पोटतिडकीने संसद, विधिमंड‌ळात मांडले. केळी प्रक्रिया उद्योग, सूक्ष्मसिंचन, पूर-कालवे योजना त्यांनी प्रभावीपणे राबवली. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मधुकर सहकारी साखर कारखान्याला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांचा वकूब लक्षात घेऊन, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असणारे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हरिभाऊंना दिले होते. जळगावच्या शेती, सहकाराच्या विकासाचा उल्लेख करताना, हरिभाऊ जावळे यांचे नाव हे पिढ्यान् पिढ्या स्मरणात राहील असे त्यांचे काम आहे. आणि त्यांच्याच वारसा अमोल जावळे हे प्रभावीपणे चालवताना दिसत आहेत….

इतर महत्वाच्या बातम्या…

पाचोरा रोटरी तर्फे प्राथमिक शाळेला शैक्षणिक साधन सुविधा भेट

Central Railway : मध्य रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

लोकसभेप्रमाणे विधानसभेत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील – रोहिणी खडसे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button