जळगावमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
हॅलो जनता न्यूज, जळगाव :
एका बांधकाम व्यावसायिकाला एक कोटी १५ लाख रुपये देऊनही मिळकतीची खरेदी करण्यात नकार देण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने रक्कम परत मागितल्यानंतर त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली गेली. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. यावर शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
धरणगाव येथील सुनील मधुकर चौधरी (५२) यांचा बांधकाम तसेच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. जळगाव महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक २११२/६० या जुन्या बांधकाम घराची खरेदी विक्री ठरवून सौदा पावती करून त्यासाठी चौधरी यांच्याकडून एक कोटी १५ लाख रुपये घेण्यात आले आणि करारनामा करण्यात आला. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तींनी खरेदी पूर्ण करण्यास टाळाटाळ केली.
चौधरी यांनी रक्कम परत मागितली असता त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. खरेदी न होऊन तसेच रक्कमही परत न मिळाल्याने चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार, मनोज लीलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी, शैलेंद्र हेमचंद्र भिरुड, हेमलता उर्फ तनुजा शैलेंद्र भिरुड, तिलोत्तमा दीपक इंगळे, दीपक पीतांबर इंगळे, संदीप हरिभाऊ पाटील, राजेंद्र गोपाळ सावदेकर, शेखर भास्कर भिरुड, शिरीष भास्कर भिरुड, नरेंद्रकुमार दत्तात्रय भिरुड, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, आणि गौरव कृष्णा भिरुड या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि शीतलकुमार नाईक करत आहेत.
AI in agriculture : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू होणार
अष्टविनायक कॉलनीत गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य सोहळा, आमदार अमोल पाटील यांचा सत्कार