हॅलो राजकारण

बिग ब्रेकींग : विशेष पोलीस महानिरीक्षकांचा दणका, मुक्ताईनगरचे पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी निलंबित

हॅलो जनता, प्रतिनिधी – मध्य प्रदेश राज्याच्या सीमा लगत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गुटखा संदर्भात अनेक कारवाया होत असून अनेकदा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लाख रुपयांचा गुटखा पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पाहायला मिळाले, यावेळी अटक करण्यात आलेल्या गुटखा तस्करांनी पोलिसांना फोन पे च्या माध्यमातून पैसे दिल्यामुळे त्यांनी तपासणी न करता गाडी सोडून दिल्याचे देखील सांगितले होते.

ही घटना ताजी असताना नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी अवैध गुटखा प्रकरणी पकडलेले वाहन सोडून दिल्याप्रकरणी मुक्ताईनगरचे पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अवैध गुटखा तस्करी करणारे वाहन जप्त करण्यात आले होते. या वाहनावर कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. तसेच हे वाहन पकडणारे पीएसआय राहुल बोरकर यांच्या पथकाने या प्रकरणात हलगर्जीपणा करून वाहन सोडून दिले. या कारणावरून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी, निखिल नारखेडे, नाईक सुरेश पाटील यांना निलंबित केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या..

पाचोऱ्यात अमोल शिंदेंना मोठा धक्का, शेकडो महिलांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश…

पाचोऱ्यात काँग्रेस ने वाजले ढोल, अन् लगेच रस्त्याचे नगरपालिकेने मार्फत काम सुरू…

चाळीसगाव दारुबंदी विभागाची मोठी कारवाई, ५ लाख ७९ हजारांचा बनावट दारू साठा जप्त

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button