पाचोऱ्यात शेकडो तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; इनकमिंग थांबेना…

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शहरातील शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा भव्य प्रवेश सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
पाचोरा शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात तरुणांनी एकमुखाने शिवसेनेचा ध्वज हाती घेत पक्षप्रवेश केला. यावेळी उपस्थित तरुणांनी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट करत, त्यांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांत शहरात झालेल्या विविध विकासकामांमुळे ते या पक्षात दाखल होत असल्याचे सांगितले. या प्रवेश सोहळ्यात बोलताना आमदार किशोर पाटील यांनी नव्या तरुण कार्यकर्त्यांचे स्वागत करत सांगितले की, ” उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना हा सामान्य जनतेच्या हितासाठी झगडणारा पक्ष असून, या पक्षात येणाऱ्या प्रत्येक तरुणाला समाजहिताची संधी मिळेल. युवकांच्या जोमामुळेच पाचोरा शहर अधिक प्रगतिशील होईल, असा विश्वास वाटतो.”
या प्रवेशामुळे पाचोरा शहरात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा थेट फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी पक्षाचे शहर प्रमुख, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षात नव्याने दाखल झालेल्या युवकांनी “शहरात नव्या दमाने काम करत, शिवसेनेची कामे आणि विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवू” असा निर्धारही व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या….
जनसेवक बंडू सोनार नगरसेवक व्हावे यासाठी रामेश्वरम येथे देवाला साकडे, जय सोमवंशी व तरुणांचा पुढाकार
विद्यापीठाच्या परिसर मुलाखतीत सात विद्यार्थ्यांची निवड, कुलगुरूंनी दिल्या शुभेच्छा…
पाचोरा बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वितरण; २ लाखांचा धनादेश वितरित