ब्रेकिंग : नेपाळ अपघातातील मयत यात्रेकरूंचे मृतदेह घेवून अँब्युलन्स भुसावळ कडे रवाना ….
हॅलो जनता, प्रतिनिधी – नेपाळ मध्ये झालेल्या बस अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल गावातील अपघातात २५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधून वायुसेनेच्या विमानाने यात्रेकरूंचे मृतदेह जळगाव विमानतळावर दाखल झालेले असून ॲम्बुलन्स च्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल या गावी त्यांचे मृतदेह ॲम्बुलन्स च्या माध्यमातून रवाना झाले आहेत.
जळगाव विमानतळावर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी विमानतळावर उपस्थित राहून पाहणी केली आहे. ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले असून त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या…..
Vaishali Suryawanshi : पाचोऱ्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आक्रमक
Sanjay Raut : ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत उद्या पाचोरा दौऱ्यावर
आमदार किशोर पाटील यांनी आदिवासी भिल्ल समाजाच्या बहिणींसोबत साजरे केले रक्षा बंधन