हॅलो राजकारण

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची निवडणुक बिनविरोध, रोहित निकम यांचे नेतृत्व सिद्ध

निवडणुकीत प्रत्येक समाजाला स्थान देवून सहकारात समन्वयाचा आदर्श जळगाव पॅटर्न

हॅलो जनता न्युज, जळगाव

जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडणुक होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, पदमश्री ॲड.उज्वल निकम, आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून निवडणुक बिनविरोध झाली.

यासंस्थेच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रत्येक समाजाला स्थान देवून सहकारात समन्वयाचा नविन आदर्श उभा करत नवीन जळगाव पॅटर्न राबविला आहे. सहकार व पणन क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील पहिली व सातत्याने ‘अ’ वर्गात असलेली संस्थेची स्थापना १९५६ मध्ये झाली असून या संस्थेला अजून भरभराटीला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी सांगितले आहे.

नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे –

रोहित निकम, संजीव मुकुंदराव पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, यादवराव विष्णू पाटील, रामनाथ चिंधु पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, मंगेश भरत पाटील, शांताराम चंद्रा सोनवणे, श्वेतांबरी रोहित निकम, सोनल संजय पवार, अरूण बाबुराव देशमुख, गजानन मल्हारराव देशमुख, प्रशांत लिलाधर चौधरी, विवेक राजाराम पाटील, अरविंद भगवान देशमुख, निळकंठ आनंदा नारखेडे, पुंडलीक दौलत पाटील, प्रताप हरी पाटील,अरूण आत्माराम पाटील यांची निवड झाली आहे.

तीन जिल्हाध्यक्षांच्या माघार

जिल्ह्यात सहकारात एक आदर्श पायंडा पडला असुन सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणजेच भाजपा जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी निंवडणुकीतून माघार घेत खऱ्या अर्थाने सहकारात राजकाराणाचे जोडे बाजुला सारून खऱ्या अर्थाने राजकीय मुस्सदेगिरी दाखवली.

बॅरीस्टर निकमांचा वारसा यशस्वी…..

कृषी औद्योगिक सहकारी संस्थेंचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी बॅरीस्टर देवराम माधवराव निकम यांचे नातु रोहित दिलीपराव निकम यांनी सहकारात यशस्वीतेकडे वाटचाल केली आहे. दिलीपराव निकम यांनी देखील सहकारात वर्चस्व सिध्द केले होते. शैलेजादेवी निकम या जिल्हा बॅंकेच्या संचालिका असुन सहकारातील केंद्र व राज्याची अनेक पदे त्यांनी भुषवली आहे. सहकाराचा वारसा समाजकारणाच्या माध्यमातून रोहित निकम हे पुढे नेत आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत खांदेपालट, नवीन चेहऱ्यांना संधी….

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे नेमका प्रकार…

पाचोऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button