जळगाव रेल्वे स्टेशन येथे विद्यार्थी दिन उत्साहात साजरा



हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ घोषित केलेला विद्यार्थी दिन आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
7 नोव्हेंबर 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 27 ऑक्टोबर 2017 रोजी हा दिवस “विद्यार्थी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
अत्युच्च विद्वत्ता, ज्ञान आणि अभ्यासशीलतेचा आदर्श असतानाही डॉ. आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. त्यांच्या या शिकण्याच्या वृत्तीचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात भंते सुबोधा थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशील वाचनाने झाली. त्यानंतर मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास चेतन नन्नवरे, जयसिंग वाघ, हरिश्चंद्र सोनवणे सर, ॲड. आनंद कोचुरे, प्रा. प्रितीलाल पवार, बाबुराव वाघ, सतीश गायकवाड, आशिष सपकाळे, सुभाष सपकाळे, बागुल साहेब, तायडे साहेब, यशवंत मोरे, अभय सोनवणे, मुकुंद सपकाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨पाचोरा ब्रेकिंग : भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
🚨 पाचोरा ब्रेकिंग : भाजपाचा परिवर्तन मेळावा, भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष…



