⁠हॅलो क्राईम

जळगाव मयुरीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप…

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. ११ : प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपली लेक सासरी सुखाने नांदावी. तिच्या संसारात तिला त्रास नको, जाच नको. परंतु अनेकदा वास्तव अगदी उलटं घडतं. नवविवाहित मुलीला सासरी छळ सहन करावा लागतो आणि शेवटी त्या असह्य वेदनांना कंटाळून ती टोकाचं पाऊल उचलते. अशीच एक हृदयद्रावक घटना जळगाव शहरातील सुंदर मोती नगर परिसरात रात्री घडली. २३ वर्षीय मयुरी ठोसर हिने सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयुरी आत्महत्या : विवाहानंतर बदलला संसाराचा रंग

मयुरी ठोसर हिचा विवाह यंदा १० मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथे गौरव ठोसर याच्याशी झाला होता. विवाहाच्या सुरुवातीला संसार सुरळीत चालला. मात्र काही दिवसांनंतर मयुरीवर सासरकडून मानसिक जाच सुरु झाला. “लग्नात मोठा हॉल हवा, जेवणात गुलाबजाम हवा,” अशा किरकोळ मागण्या पुढे करून माहेरच्यांवर दबाव आणला गेला. माहेरकडून दहा लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक आरोप मयुरीच्या आईने केला आहे.

जळगाव मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरण
जळगाव मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरण

मयुरी आत्महत्या : बहिणीशी शेवटचा संवाद

लग्नानंतर मयुरीचा छळ वाढत गेला. बुधवारी दुपारी तिने आपल्या बहिणीला फोन करून त्रासाची कहाणी सांगितली. मात्र काही तासांतच तिने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. रात्री नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मयुरी आत्महत्या : आईचा आक्रोश, उपस्थितांचे डोळे पाणावले

घटनेची माहिती मिळताच माहेरचे लोक जळगावला धावले. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात मुलीचा मृतदेह पाहून मयुरीची आई हंबरडा फोडला. “माझी मुलगी हुशार होती, शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकावर यायची. ती असं पाऊल उचलूच शकत नाही. सासरच्या लोकांनी गोड बोलून बोलून आमच्याकडून दहा लाख रुपये उकळले. माझ्या लेकीसोबत जे घडलं ते दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत घडू नये,” अशा शब्दांत तिने वेदना व्यक्त केल्या.

मयुरी आत्महत्या : पोलिस तपास सुरू

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे. माहेरच्यांच्या आरोपांनंतर सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 ब्रेकिंग: महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची या नेत्याकडे, राजकीय चर्चांना उधाण..

Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप

🛑 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button