ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जमीन मोजणीच्या शुल्कात वाढ….
हॅलो जनता न्युज, मुंबई
राज्य सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कात वाढ केली असून १ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. यापूर्वी साधी, तातडीची, अतितातडीची व अतिअतितातडीची अशा चार प्रकारांमध्ये मोजणी केली जात होती. आता केवळ नियमित व द्रूतगती अशा दोनच प्रकारात शुल्क आकारणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे महापालिका-पालिका हद्द व ग्रामीण हद्द असे दोनच प्रकार ठेवण्यात आले असून शेतजमीन व भूखंड या दोन्ही शुल्कांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
जमीन मोजनीत अशी झाली आहे वाढ….
शेतजमिनीच्या हद्दीतून वादविवाद, न्यायालयीन खटले वाढत असतानाच मोजणीसाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे. नियमित मोजणीसाठी (पान ४ वर)(पान १ वरून) ९० दिवसांचा तर द्रुतगती मोजणीसाठी ३० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी चार प्रकारांमधील मोजणीसाठी प्रति २ हेक्टर अनुक्रमे १ हजार, २ हजार, ३ हजार आणि ४ हजार असे दर आकारले जात होते. नव्या बदलांनुसार शेतजमिनीसाठी नियमित मोजणी २ हजार आणि द्रुतगती मोजणीसाठी ८ हजार रुपये आकारले जाणार असून २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास नियमितसाठी १ हजार रुपये व द्रुतगतीसाठी ४ हजार रुपये अतिरिक्त भरावे लागतील.
व्यावसायिक भूखंड मोजणी दर अनुक्रमे ३ हजार रु. आणि १२ हजार रुपये करण्यात आला आहे. महापालिका-पालिका हद्दीसाठी नियमित जमीन मोजणी दर ३ हजार रु. द्रुतगतीसाठी १२ हजार रुपये प्रति हेक्टर तर एक हेक्टर मर्यादेपुढील जमिनीसाठी नियमित शुल्क १५०० रुपये तर द्रुतगतीसाठी ६ हजार रुपये आकारले जातील. शहरी भागांत यापूर्वीचा दर १० गुंठ्यांसाठी होता. आता तो प्रती हेक्टरी झाला आहे.
जमीन मोजणीसाठी इतके दर जास्त लागतील….
त्यामुळे शहरांतील मोजणी शुल्क तुलनेने कमी झाले असून ग्रामीण भागात मात्र झळ सहन करावी लागणार आहे. याशिवाय उच्च तपासणीसाठी (निमताना मोजणी) प्रत्यक्ष भरलेल्या मोजणी शुल्काच्या तीनपट दराने शुल्क आकारले जाणार आहे. भूमी अभिलेख उपअधीक्षक, नगर भूमापन अधिकारी यांच्यामार्फत उच्च पातळीवर करण्यात येणाऱ्या निमताना मोजणीसाठी मोजणी शुल्क दर हे मूळमोजणी प्रकरणी प्रत्यक्ष भरलेल्या मोजणी शुल्काच्या पाचपट दराने आकारले जातील. गुंठेवारीसाठी ग्रामीण भागात दीडपट तर महापालिका, पालिका हद्दीत दीडपट शुल्क आकारले जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
कंडारी आरोग्य उपकेंद्राअंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस प्रारंभ
ब्रेकिंग : एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपद, त्यासोबत मिळणार “ही” महत्वाची खाती…
अमित शहांच्या ‘त्या’ शब्दाने चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित