हॅलो राजकारणहॅलो सामाजिक

पाचोऱ्यात काँग्रेस ने वाजले ढोल, अन् लगेच रस्त्याचे नगरपालिकेने मार्फत काम सुरू…

सत्ताधाऱ्यांनी कमिशन न घेता कामाकडे लक्ष द्यावे - सचिन सोमवंशी

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा नगरपरिषद च्या मुख्याधिकारी दालनासमोर राष्ट्रीय काँग्रेसने शहरातील विविध समस्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन केले. आंदोलनात जोरदार ढोल वाजवल्यांनंतर झोपलेले नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि तब्बल पाच वर्षांनंतर कामाला सुरुवात झाली आहे.

पाचोरा शहरातील नागरिकांच्या वाढत्या समस्या, नागरिकांना चालायला रस्ता नाही. या विरोधात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर ढोल बजाव आंदोलन करून प्रशासनाला खडबडून जागे करण्याचे काम काँग्रेस ने केले आहे.

पाचोरा शहरातील मिल्लत नगर या भागातील नागरिकांना चालायला रस्ता नाही, या भागातील रस्त्याचे काम मंजूर होऊन देखील काम सुरू न झाल्यामुळे नागरिक त्रस्त होते. या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन काँग्रेसने मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि समस्यांचा पाढाच वाचून दाखवला यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी तात्काळ शहरातील ज्या ज्या भागातील समस्या आहेत त्या आम्ही सोडवु हे वचन दिले तेव्हा नागरिकांचा संताप शांत झाला.

लागलीच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी मिल्लत नगर भागात भेट दिली आणि संबंधित ठेकेदाराला काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण. माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, इरफान मणियार, महीला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पेश येवले, झानेश्वर पाटील, कुसुम पाटील डॉ. मंजूर खाटीक, शरीफ शेख, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश चव्हाण,संदिप पाटील, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अजीम देशमुख, नदीम शेख, आबिद शेख जाबीर बागवान, मुस्तगिर टकारी, नईम मन्यार, रवी पावरा, सै. सय्यद युनुस मणियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या…

चाळीसगाव दारुबंदी विभागाची मोठी कारवाई, ५ लाख ७९ हजारांचा बनावट दारू साठा जप्त

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, शासकीय ज्वारी खरेदीसाठी उद्दिष्ट वाढले इतक्या शेतकऱ्यांना होणार फायदा….

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button