हॅलो राजकारण

आमदार किशोर पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, सागर बंगल्यावर मिळाला गणपती बाप्पाच्या आरती मान

हॅलो जनता, जळगाव – पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर निवासस्थानी भेट घेतली.

आमदार किशोर पाटील

यावेळी सागर बंगल्यावर स्थापना केलेल्या गणपती बाप्पाच्या आरतीचा मान आमदार किशोर पाटील यांना मिळाला. तसेच पाचोरा भडगाव मतदार संघातील विविध मुद्द्यांवर आमदार किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

भाजपा नेते, माझे विधानसभेतील आवडते नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या “सागर” या निवासस्थानी भेट देऊन गणरायाची आरती करण्याचे भाग्य लाभले. तसेच त्यांच्याशी मतदार संघातील अनेक विषयांवर चर्चा केली

– आमदार किशोरआप्पा  पाटील

इतर महत्वाच्या बातम्या…

सेवानिवृत्त चालक अमृत पाटील यांचा स्त्युत उपक्रम, गावातील स्मशानभूमीत केले वृक्षारोपण

चोपडा : १२ वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खून, संतापजनक प्रकाराने खळबळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button