हॅलो राजकारण

आमदार किशोर पाटील यांनी आदिवासी भिल्ल समाजाच्या बहिणींसोबत साजरे केले रक्षा बंधन

किशोर आप्पा खरंच आमचे सख्खे भाऊ ...बहिणी भरावल्या....

हॅलो जनता, प्रतिनिधी – आज रक्षाबंधन सारखा पवित्र सण आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा शहरातील एकलव्य नगर परिसरातील आदिवासी भिल्ल समाजातील बहिणींसोबत साजरा केला. यावेळी शेकडो महिला बहिणींनी आमदार किशोर पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले तर आमदार किशोर पाटील यांनी आपल्या लाडक्या बहिणींना साडी आणि मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले.

यावेळी सर्व बहिणींनी जसे भाऊ म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत तसे भावाच्या पाठीशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून पुन्हा आमदार बनण्याचा निर्धार करत आशीर्वाद आमदार किशोर पाटील यांना दिला आहे.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगरसेवक बंडू चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सुमित सावंत, बंडू चौधरी, आकाश पाटील, किशोर भोई,माजी नगरसेवक शांताराम मोरे, नितीन तायडे, छोटू महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या..

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन, वैद्यकिय क्षेत्रात शोककळा…

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील

ब्रेकिंग न्यूज : वैशाली सुर्यवंशी यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button