हॅलो राजकारण

अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र येणार?, या नेत्याने केले वक्तव्य

हॅलो जनता, प्रतिनिधी – अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महायुतीत अजित पवार एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी व्यक्त केलाय. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

नेमके अमोल मिटकरी काय म्हणाले….

अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं. हे माझं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करावा. महायुतीत अजित पवार यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोये. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करीत आहेत. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवतील. दोन्ही नेत्यांमध्ये दुवा होण्याची संधी मिळाल्यास स्वत:ला भाग्यवान समजेन. अस वक्तव्य त्यांनी केलेलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या…

यावल तालुक्यातील पाडळसा गावातील शेतकऱ्याला बांधून मारहाण, फैजपूर पोलीस स्थानकात पिता पुत्राविरोधत गुन्हा

भुजल सर्वेक्षण विभागात दारूच्या बाटल्यांचा खच, दुषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी दारूच्या बाटल्यांचा वापर…

जामनेर दगडफेक प्रकरण : ३०० पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हे दाखल तर १५ संशयितांना अटक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button