रावेर तालुक्याला चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, कोकणच्या धर्तीवर पॅकेज जाहीर करण्याची साळवे यांची मागणी….

हॅलो जनता प्रतिनिधी – गेल्या आठवड्यापरापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. एकीकडे खरीप हंगाम सुरू झाला असून पाऊस पडल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टर वरील केळी पिके जमीन दोस्त झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाची नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी केळीही कापणी वर आली असून हातात तोंडाशी आलेला घास फिरवल्याने शेतकऱ्यांवर मोठ हार्दिक संकट कोसळलेला आहे त्यामुळे केळी नुकसानीची तात्काळ पाहणी करून सरसकट पंचनामे करावे आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे यांनी नुकसानग्रस्त रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली असून महाराष्ट्र शासनाने कोकणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात जे पॅकेज जाहीर केलेला आहे तसेच पॅकेज हे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची मागणी करत झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल तयार करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी यावेळी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या..
जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानग्रस्त शेताची पाहणी
बैल वाचवले पण शेतकरी मेला, रेल्वे अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन