यावल तालुक्यातील पाडळसा गावातील शेतकऱ्याला बांधून मारहाण, फैजपूर पोलीस स्थानकात पिता पुत्राविरोधत गुन्हा

हॅलो जनता, जळगाव – यावल तालुक्यातील पाडळसा या गावात शेताला शेत लागून असलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये शेताच्या बांध आहे. या बांधावर लावण्यात आलेल्या वांग्याचे झाड तोडल्यावरून शेतकरी पिता-पुत्र यांनी वृद्ध शेतकऱ्यांचे दोऱ्याने हातपाय बांधले व बैलगाडीत टाकून थेट गावातील पीक सोसायटीत आणले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील पाडळसा गावात सुरेश कचरे या ६१ वर्षीय वृध्द शेतकऱ्याने शेतीच्या बांधावरील वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून शेतकरी पिता- पुत्राने या वृध्दाचे दोराने हात पाय बांधले व बैलगाडीमध्ये टाकून थेट शेतातून गावात आणल्याची माहिती मारहाण झालेल्या वृध्द शेतकऱ्याने दिली आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात आणले आहे. याप्रकरणी वृध्दाच्या तक्रारीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पिता पुत्राच्या तक्रारीवरून वयोवृद्धा विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
जामनेर दगडफेक प्रकरण : ३०० पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हे दाखल तर १५ संशयितांना अटक
जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता, एस आर पी एफच्या पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त