विधानसभा २०२४

ब्रेकिंग : राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजात महायुतीला “इतक्या” जागा मिळणार…

हॅलो जनता, मुंबई –

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. आज मंगळवारी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.

यापूर्वी फलोदी सट्टा बाजाराने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज काही प्रमाणात फेल ठरला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालांविषयी भाकीत केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागांवर विजय मिळू शकतो. महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. तर महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज आहे.

भाजपला 87 ते 90 जागा मिळू शकतात, असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी महायुतीवर 40 पैसे तर महाविकास आघाडीवर 2 ते 2.50 रुपयांचा भाव लागताना दिसत आहे.

याशिवाय, झारखंडमध्येही भाजपला 55 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. यापैकी 55 जागांवर मिळाल्यास भाजपला झारखंडमध्ये एकहाती सत्ता स्थापन करता येऊ शकते. त्यामुळे आता फलोदी सट्टा बाजाराचे हे अंदाज महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये कितपत खरे ठरणार, हे आता 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.

दरम्यान, मतदानाला अवघे काही तास उरल्याने आता महाराष्ट्रातील उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. आज राज्यात किती टक्के मतदान होते, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील हे देखील राजकीय विष्लेशकांकडून सांगितले जात आहे….

नोंद – ( सट्टा बाजाराचे अंदाज हे चुकीचे असू शकतात. हॅलो जनता वृत्त संस्था त्यांचे समर्थन करत नाही)

इतर महत्वाच्या बातम्या….

ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघात कोण मारणार बाजी? सट्टा बाजारात विद्यमान आमदारांची हवा.

Vidhansabha nivdbuk  : मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य : आयोग

Kishorappa Patil : पुढील पाच वर्षात पाचोरा भडगाव पॅटर्न हा संपूर्ण राज्यात राबविला जाईल, आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला विश्वास….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button