भुसावळ येथील अभाविप कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील यांनी दिली भेट….

हॅलो जनता भुसावळ – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांताचा कार्यक्रम भुसावल येथील बियाणी मिलिटरी स्कूल येथे 11 ते 14 जून दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या वेळी गोदावरी फौंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील यांनी आज भेट देऊन प्रदर्शनीची पाहणी करून संवाद साधला.
या प्रसंगी पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री श्री.देवदत्त जोशी, देवगिरी प्रांत संघटनमंत्री सिध्देश्वर लटपटे, प्रदेश अध्यक्ष श्री.सचिन कंदले, ललित सोनार सह संयोजक मेडीव्हिजन, भुसावळ जिल्हाप्रमुख गिरीश कुलकर्णी, निकिता कांबळे, अस्मिता शेटे, गणेश मुसळे, पियुष चिंचकर यांच्यासह अभाविप, मेडिव्हीजन चे पदाधिकारी उपस्थित होते.
या अभ्यास वर्गामध्ये नंदुरबार, धुळे, भुसावळ, छत्रपती संभाजी नगर, जालना,लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड महानगर व किनवट चे विद्यार्थी आणि पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी येथील प्रदर्शनीच्या माध्यमातून परिषदेचे कार्य जाणून घेऊन अभाविप सह मेडीव्हीजन चे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबत डॉ. केतकी पाटील यांनी चर्चा केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या..
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, असे आहे नियोजन…
Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..
जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना