भडगाव तालुक्यातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, किशोर आप्पाची ताकद वाढली…
हॅलो जनता, भडगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदार संघात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो तरुण आणि इतर पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज देखील भडगाव तालुक्यातील वडजी गावासह परिसरातील शेकडो तरुणांनी आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व आणि विकास कामे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भडगाव तालुक्यातील वडजी या गावातील अमोल शिंदे यांचे कट्टर समर्थक जगदीश पाटील यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असून भडगाव तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास हा आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वातच झाला आहे. आमदार किशोर पाटील यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आणत पुढील काळात भडगाव तालुक्याचा अजून विकास करून एक नंबर तालुका बनवण्याचा निश्चय यावेळी या तरुणांनी केला आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय सावंत पाटील (भुरा अप्पा), शिवसेनेचे प्रवक्ते प्रदीप देसले, समन्वय समिती अध्यक्ष भडगाव युवराज पाटील, शहर प्रमुख आबा चौधरी, समाधान दादा (फौजी), वडजी येथील पत्रकार सुधाकर पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, भाऊसाहेब दादा, वाक् येथील स्वप्नील पाटील, खुमानसिंग दादा, यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…
इतर महत्वाच्या बातम्या..
पाचोऱ्यात अमोल शिंदेंना मोठा धक्का, शेकडो महिलांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश…
पाचोऱ्यात काँग्रेस ने वाजले ढोल, अन् लगेच रस्त्याचे नगरपालिकेने मार्फत काम सुरू…