बापरे! अमळनेरात आढळला कोब्रा पेक्षा पाचपट विषारी पोवळा जातीचा दुर्मिळ साप
हॅलो जनता, प्रतिनिधी – अमळनेर शहरातील अयोध्यानगर भागात दुर्मिळ जातीचा आणि कोब्रा म्हणजे नाग या जातीच्या सर्पापेक्षा पाच पटीने विषारी जातीचा साप आढळून आला. म्हशींच्या गोठयाजवळ तपकिरी रंगाचा साप दिसल्याने सर्पमित्र कृष्णा पाटील यांना संबंधितांनी असता सर्प मित्र कृष्णा पाटील यांनी उपलब्ध माहितीनुसार हा पोवळा (स्लेण्ड र कोरल) जातीचा साप असल्याचे ओळखले. काळाच्या ओघात ही जात नष्ट होत चालली आहे.
नेमकी काय आहे पोवळा जातीच्या सापाची वैशिष्ट्ये….
कोब्रा जातीपेक्षा पाचपट विषारी साप असून त्याच्या तोंडाचा भाग मानेपर्यंत काळा असतो. पोटाचा भाग नारिंगी तर शेपटीच्या टोकाजवळ काळे ठिपके असतात. हा साप लहान किडे , अळ्या आणि लहान कीटकांची अंडी खातो. प्रथम दर्शनी त्याचे तोंड नेमक्या कोणत्या दिशेने आहे हे समजत नाही. सर्पमित्र कृष्णा पाटील यांनी हा साप पकडून त्याला जंगलात सोडले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या..
आरक्षणाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, नेमके काय घडले बैठकीत….
Jain Irrigation : जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड
Rohini khadse : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या