बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार सुरूच, समोर आली धक्कादायक माहिती….
हॅलो जनता, प्रतिनिधी – बांग्लादेशात आताही हिंदुसह इतर अल्पसंख्याक समाजावर अत्याचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले होत असल्याचे दिसून आले. आता हल्ले आणि अत्याचाराचा सामना केल्यानंतर येथील हिंदूंना सरकारी नोकऱ्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. ५ ऑगस्टपासून जवळपास ५० हिंदू शिक्षणतज्ज्ञांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे.
यासंदर्भातील माहिती बांगलादेश छात्र एक्य परिषदेने शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. छात्र एक्य परिषद ही बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांची एक संघटना आहे. दरम्यान, ‘आज तक’ या वेबसाइटने राजीनामा दिलेल्या शिक्षकांची यादी मिळवली आहे. यानुसार, सरकारी बकरगंज कॉलेजच्या प्राचार्या शुक्ला रॉय यांनी राजीनामा दिल्याचा फोटोही समोर आला आहे. साध्या कागदावर “मी राजीनामा देत आहे” इतकच लिहून त्यांचा राजीनामा घेण्यात आला.
बांगलादेशातील हिंदूंची स्थिती अजूनही गंभीर, अत्याचार सुरूच…
काही शिक्षकांनी ‘आज तक’शी बोलताना बांगलादेशातील हिंदू शिक्षकांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला. ढाका विद्यापीठातील गणित विभागाचे प्राध्यापक डॉ. चंद्रनाथ पोद्दार यांना विद्यार्थ्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. ज्या शिक्षकांनी भीतीपोटी कॅम्पसमध्ये न येण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना त्यांच्या घरी जावून अपमानित केले जात आहे आणि शिक्षकांना जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात असून आम्हाला संरक्षण द्यावे अशी मागणी या पीडित शिक्षकांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
चाळीसगावात महाविकास आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक अंतयात्रा काढून सरकारचा निषेध
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात राकेश सुतार सन्मानित