नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पाचोऱ्यात बेमुदत संप, आमदार किशोर पाटील यांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट
हॅलो जनता, प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करणे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (नवीन) तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यांवर कार्यवाही करणे यासह अन्य मागण्यांसाठी पाचोरा येथील नगर परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेकडून बेमुदत संप पुकारण्यात आला होता.
महाराष्ट्र शासन अंतर्गत नगरपरिषद नगरपंचायती मधील राज्य संवर्ग 3 हजार अधिकारी व स्थानिक 60 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने दोन दिवसांपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध रास्त मागण्यांचा सरकारने विचार करावा आणि लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्र्वासन यावेळी आमदार पाटील यांनी दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात फळ वाटप
जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….