तायक्वांडोपटू पुष्पक रमेश महाजन “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

हॅलो जनता न्युज – जळगाव
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “गुणवंत खेळाडू” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०२४-२५ चा “गुणवंत खेळाडू पुरस्काराने आज जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक उपस्थित होते.
पुष्पक ला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री सौरभ चौबे, श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, जयेश बाविस्कर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…
ST Mahamandal : एसटी भाडेवाढीने प्रवास महागला, महिलांसाठी 50 टक्के सूट कायम
“उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – 2025” -अभिजित भांडारकर