एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम.

जळगाव प्रतिनिधी
जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २९३ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली असून, राज्यात जळगाव आघाडीवर आहे. ठाणे जिल्हा (१ हजार ९९९) दुसऱ्या, तर नागपूर जिल्हा (१ हजार २३४) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने ही मोहीम सुरू केली आहे. मात्र, लसीबाबत नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे अनेक ठिकाणी प्रतिसाद कमी मिळत आहे.
यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आरोग्य यंत्रणेला सक्रिय करत प्रभावी जनजागृती मोहीम राबविली. त्यामुळे नागरिकांमधील गैरसमज दूर होऊन लसीकरणाबाबत विश्वास निर्माण झाला आहे.
जिल्ह्यासाठी ४१ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, ८ मार्च रोजी जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पुढील तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
दरम्यान, या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले असून, उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या….
जागतिक महिला दिनी भडगाव येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ.
पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी…




