हॅलो राजकारण

Vaishali Suryawanshi : पाचोऱ्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आक्रमक 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करत केला निषेध...

हॅलो जनता, प्रतिनिधी – बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील अमानवी अत्याचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशाली सूर्यवंशी ( Vaishali Suryawanshi)  यांच्या नेतृत्वात पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेसाठी अपयशी ठरलेल्या महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून पुतळ्याचे दहन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी ( Vaishali Suryawanshi) यांनी केली आहे.

तसेच अशा पद्धतीने महिला आणि लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, या संदर्भात कडक कायदे करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन, वैद्यकिय क्षेत्रात शोककळा…

ब्रेकिंग न्यूज : वैशाली सुर्यवंशी यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button