देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान
हॅलो जनता न्युज :
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर व अशपाक फाउंडेशन यांच्या वतीने देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. अशपाक फाउंडेशनचे अध्यक्ष अशपाक खटीक यांच्या हस्ते फातिमा शेख यांच्या फोटोला हार घालून त्यांचे योगदान सन्मानित करण्यात आले.
फातिमा शेख यांनी क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांच्यासोबत काम करून अल्पसंख्यांक समाजासाठी शिक्षणाची महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी मोठे कार्य केले आणि मुलींसाठी भारतातील पहिल्या शाळांपैकी एक ‘स्वदेशी लायब्ररी’ सह-स्थापित केली. याच काळात फातिमा शेख यांना पहिल्या महिला शिक्षिके होण्याचा मान मिळाला.
या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर अध्यक्ष अशपाक मुनाफ खाटीक, जावेद खाटीक, मोहसिन शाह, शाहिद शेख, मंडल क्र. 1 चिटणीस नानाभाऊ, हामिद शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…