Nivdnuk aayog : “”विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना १८ आणि १९ नोव्हेंबरला सुट्टी नाही – शिक्षण आयुक्त सूरज मांढरे””
हॅलो जनता, जळगाव :
भारत निवडणूक आयोगाने (Nivdnuk aayog) १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे कार्यक्रम जाहीर केले आहेत. यानुसार २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त लोक मतदान हक्काचा वापर करीत सहभागी होऊ शकतील यासाठी २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली तरी १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी का होईल, याबद्दल शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
यावर शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी करून स्पष्टता दिली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत माहिती देत सांगितले आहे की, शासन आदेशानुसार १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळा सुरूच राहतील. या दोन दिवसांमध्ये कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
तर सुट्टी जाहीर केली पाहिजे – सूरज मांढरे
केवळ त्या शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली जाईल, ज्या ठिकाणी सर्व शिक्षक निवडणूक कामकाजासाठी नेमले गेले आहेत आणि त्यामुळे शाळेत शिक्षक उपलब्ध नाहीत. अशा शाळांमध्ये स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर केली पाहिजे. याशिवाय इतर सर्व शाळा नियमितपणे कार्यरत राहतील.
शाळा बंद ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन कोणत्याही शाळेला अनावश्यकपणे बंद ठेवण्याचे टाळावे.