हॅलो राजकारण
MVA Jalgaon : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत धरणगावात करण पवार पाटील यांच्या प्रचाराला सुरवात
हॅलो जनता (जळगाव) – MVA Jalgaon लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून आज धरणगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांच्या प्रचारार्थ मशाल पेटवून गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी रॅली दरम्यान गावातील घरोघरी जावून शिवसैनिकांनी नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत उपस्थित मतदार बंधू भगिनींना मशाल निशाणी समोरील बटन दाबून करण पवार पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.
याप्रसंगी ठाकरेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हा प्रमुख व मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी संघटक राजेंद्र ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील, राष्ट्रवादी तालुका प्रमुख धनराज माळी कॉग्रेस चे तालुका प्रमुख व्ही डी पाटील यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,आम आदमी पक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.