Murder case : धक्कादायक : या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून
हॅलो जनता, पाचोरा
(Murder case) पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील एका पतीने आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेत तिला निर्दयपणे गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी, १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १ वाजता घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून, पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Murder case) करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव भाय्या उर्फ भैय्या शंकर चव्हाण (वय ५८) असून, तो गोराडखेडा (ता. पाचोरा, जि. जळगाव) आणि कुसम्या (ता. निवाली, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैय्यादीबाई भाया उर्फ भैय्या चव्हाण (वय ५२) या महिला आपल्या पती भाया उर्फ भैय्या चव्हाण (वय ५८) यांच्या सोबत मध्यप्रदेशातील कुसम्या येथून पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे राहत होत्या. परंतु, पती नेहमीच पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असत
१५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता पतीने पत्नी झोपलेली असताना तिच्या गळ्यात रूमाल आवळून तिचा खून केला. यानंतर ही घटना उघडकीला आल्यावर पाचोरा पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
शेतकरी चंद्रकांत काशिनाथ पाटील (वय ३२, रा. गोराडखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात आरोपी भाया उर्फ भैय्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Murder case) केला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
Bacchu Kadu : आ. बच्चू कडू गाजवणार रावेरचे मैदान, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका