Jalgaon : जळगाव जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था, मनसे आक्रमक
हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्हा क्रीडा संकुलात अनेक स्पर्धा होत असतात, मात्र सद्यस्थितीमध्ये क्रीडा संकुलाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव येथील क्रीडा संकुलामध्ये अनेक तरुण विविध खेळांचे प्रशिक्षण आणि क्रीडा स्पर्धांची तयारी करत असतात. मात्र या क्रीडा संकुलात अनेक समस्या निर्माण झाल्या असून जिल्ह्यातील खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याची तात्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दखल घेण्यात आली असून हा जिल्हाधिकाऱ्यांना क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेविषयी निवेदन देत तात्काळ सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
जळगाव (Jalgaon) जिल्हा क्रीडा संकुलात मैदानाची स्थिती अत्यंत खराब आहे. या ठिकाणी जिम आणि व्यायाम शाळेतील उपकरणे खराब झाली असून तुटलेली आहेत, त्यामुळे अनेक खेळाडूंना शारीरिक क्षमतेच्या विकासासाठी या उपकरणांचा वापर करता येत नसल्याचे समोर आले आहे. क्रीडा संकुलातील स्वच्छतागृही आणि शौचालयाची स्थिती देखील खराब आहे. त्यासह प्रशिक्षकांची कमतरता, सुरक्षेची समस्या, पाण्याची समस्या, वैद्यकीय सुविधा तसेच खेळाडूंना राहण्यासाठी योग्य निवास व्यवस्था नसल्याचे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तात्काळ या समस्यांची निकालान करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Patrkara Sanvada Yatra : पत्रकारांना सुद्धा आता मतांची ताकद दाखवावी लागेल – वसंत मुंडे
Kulbhushan Patil : कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट