प्रदूषण नियंत्रणासाठी सरसावली मनपा, सव्वा कोटीचे अत्याधुनिक वाहन प्रशासनाच्या ताफ्यात दाखल
जळगाव प्रतिनिधी – जळगाव शहर महापालिका क्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने १ कोटी १६ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक वाहने खरेदी केले आहे. या वाहनातून सध्या उन्हाळ्यात रस्त्याजवळील झाडांना पाणी देण्यासोबत हवेतील धूळ नियंत्रण केले जात आहे.जळगाव शहरात पहिल्यांदाच अशापद्धतीने धूळ नियंत्रण केले जात असल्याने रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या अत्याधुनिक वाहनाच्या स्वच्छतेमुळे रहिवाशांना स्वच्छ हवेसोबत रस्त्यालगतच्या झाडांवर बसलेली धूळ जमिनीवर बसत असल्याने झाडांनाही मोकळा श्वास घ्यायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मुंबई पुणे पाठोपाठ जळगाव सर्वात प्रदूषित शहर
राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत जळगाव शहराचा समावेश आहे. गेल्या वर्ष भरापूर्वी ३५० घ्या वर प्रदूषण निर्देशांक नोंद झाली होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्ते दुरुस्ती तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे महापालिका क्षेत्रात काही अंशी प्रदूषणाचा निर्देशांक कमी झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिका तत्कालिन आयुक्त तथा प्रशासक यांनी तब्बल १ कोटी १६ लाख रुपये खर्चाची अत्याधुनिक धूळ नियंत्रण करण्यासाठी एका वाहनची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे खरेदी केले आहे.
असे होणार वाहनाच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणाचे काम
या वाहनातून पाण्याचे तुशार हवेत वेगाने फेकल्याने त्या परिसरातील ठराविक उंची वरील धूळ जमिनीवर बसेल. दिवसभरात हे वाहन १४ ते १५ किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यालगतच्या परिसरात धूळ नियंत्रण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच महानगर पालिकेने खरेदी केलेली हे वाहन सध्या पालिकेच्या ताफ्यात कार्यान्वित झाले आहे.
विशेष म्हणजे या वाहनातून हवा शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे पाणी हे महापालिकेच्या केंद्रातून शुद्धीकरण केलेले असल्याने हवा शुद्धीकरणासाठी पालिका प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करत असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अपव्यय पालिका टाळला जाणार आहे. या वाहनातील डिझेल इंधनाचा खर्च पालिका करणार आहे. उन्हाळ्यातील चढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे या वाहनातून रस्त्यालगत उडणाऱ्या पाण्याचे तुषार हवेतील धूळ नियंत्रण करत आहेत. मात्र रस्त्यालगतच्या परिसरात थंडावा राहत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येणार आहे.
केंद्र सरकारच्या जिएम पोर्टल द्वारे राज्यासह देशभरात मोठमोठ्या शहर महानगरात ऑनलाईन प्रोसेस राबविली जात आहे. एन कॅप अंतर्गत हवा वायू प्रदूषण नियंत्रण अंतर्गत जळगाव शहर महानगर पालिका प्रशासनाकडून तत्कालीन आयुक्त यांच्या कार्यकाळात गेल्या काही महिन्यां पूर्वीच हे वाहन खरेदी प्रक्रिया करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जळगाव शहरात सकाळी ४ ते ९ वाजेदरम्यान ८ ते १० कि..मी. अंतरावरील परिसरात या वाहनाद्वारे स्वच्छता केली जात आहे.
उदय पाटील. सहायक आयुक्त (आरोग्य विभाग) मनपा जळगाव.