Cotton Farming : एकीकडे पाऊस तर दुसरीकडे व्यापारी, कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात…
हॅलो जनता प्रतिनिधी – (जळगाव)
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चार हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे जिल्ह्यात नुकसान झालेला आहे. यात सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन कापूस वेचणीवर आला असताना मुसळधार पावसामुळे कापूस पिकाला (Cotton Farming) फटका बसला असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे.
त्यामुळे एन दिवाळीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. खरीप हंगामात कापसाचा पहिलाच शेतमाल हा मुसळधार पावसामुळे जमिनीवर पडला असून त्यांना जमिनीवरच झाडे उगल्याचे पाहायला मिळत असून ओला माल वेचल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
दुसरीकडे पाऊस सुरू असल्याने मजूर देखील कापूस (Cotton Farming) वेचणीसाठी मिळत नसल्याने शेतकरी हा पुरता अडचणीत सापडला असून शासनाने यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी हॅलो जनता न्युज शी बोलताना शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील कुणीही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आले नाही, मात्र हॅलो जनता न्युज चे शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.
ब्रेकिंग : भाजप महाराष्ट्रात “इतक्या” जागांवर लढणार, दिल्लीत सर्व काही ठरलं…
ब्रेकिंग : रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी निश्चित…