Bus Accident : एसटी बस आणि ट्रक चा भीषण अपघात, अपघातात ६ प्रवासी जखमी तर …..
हॅलो जनता (नाशिक) – मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ आज मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत (Bus Accident) सहा प्रवासी ठार तर सुमारे ३० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती चांदवड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव कडून वसई कडे जाणाऱ्या बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिली, ही धडक इतकी जोरदार होती की, यात एसटी महामंडळाच्या बसचा चकानाचुर झाला असून ६ प्रवाश्यांचा मृत्यू तर ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती मात्र चांदवड पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
Bus Accident : पाचोरा आगाराच्या चालक आणि वाहकांनी बजावली महत्वाची भूमिका
महामंडळाच्या बसचा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी पाचोरा आगारातून नाशिक कडे जाणाऱ्या एसटी बस मधील चालक आणि वाहक यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत करत रुग्णवाहिकेला फोन लावून बोलावले. जे गंभीर जखमी होते त्यांना धीर देत प्राथमिक उपचार देखील केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे. दोन तास सर्व अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहचविल्यानंतर चालक आणि वाहक हे नाशिक कडे रवाना झाले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.
Jalgaon : राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कॅन्सर, नेत्ररोग रुग्णांवर अल्पदरात उपचार…
Jalgaon Loksabha: वयोवृध्द नागरिकांचे मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाची अनोखी शक्कल