Big Breaking : एकनाथ शिंदेच्या मंत्र्याने दिला राजीनामा, हे आहे कारण…
हॅलो जनता प्रतिनिधी – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही मंत्री, आमदारांना मैदानात उतरवलं होतं. त्यातील जे निवडणुकीत विजयी झाले त्यात मंत्री संदीपान भुमरे यांचाही समावेश होता. संदीपान भुमरे हे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. मविआच्या चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा भुमरेंनी पराभव केला. लोकसभेत विजयी झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सोपवला आहे.
याबाबत आमदार संजय शिरसाट म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निवडून आल्यानंतर १४ दिवसांत २ पदांपैकी एकाचा राजीनामा द्यावा लागतो. संदीपान भुमरे हे आता दिल्लीत खासदार राहतील. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात किंवा त्यांच्याकडील विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आता भुमरेंकडे राहिला नाही. भुमरेंकडील खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आले आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत. काहीजण आपापल्या परीने तर्क लढवत आहेत. कोणी काही ना काही तारखा देतोय. परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवत नाहीत तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळे आमच्यासारख्यांना हा प्रश्न विचारण्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांना हे विचारलं तर त्याचे योग्य उत्तर तुम्हाला मिळेल असं सांगत संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या..