Ajay-Atul live Show : नववर्षाच्या स्वागतासाठी अजय-अतुल यांचा जळगाव जिल्ह्यात 31 डिसेंबरला भव्य लाईव्ह कार्यक्रम!
हॅलो जनता, जळगाव : Ajay-Atul live Show
३१ डिसेंबरच्या संध्याकाळी नववर्षाचे स्वागत संगीताच्या स्वरांत करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र सज्ज झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे, वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवरील हिरवळीवर, भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा पहिला लाईव्ह कार्यक्रम होणार आहे.
२२ एकर हिरव्यागार परिसरात भव्य आयोजन
वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवरील सुंदर बेटावर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या अंतर्गत हा सोहळा रंगणार आहे. पर्यटकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी वाघूरच्या पाण्यातून बोटीचा अनोखा अनुभव देखील घेता येणार आहे.
Ajay-Atul live Show : कार्यक्रमाची रुपरेषा:
– दुपारी २ वाजता विविध कार्यक्रमांची सुरुवात
– रात्री ८ वाजता अजय-अतुल यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सची जादू
– रात्री १२ वाजता नववर्षाच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी आतिषबाजी
आकर्षकतेने नटलेला अनुभव
निसर्गाच्या सान्निध्यात, सुप्रसिद्ध अजय-अतुल यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने वातावरण भारून जाणार आहे. फटाक्यांच्या दिमाखदार आतिषबाजीत 2024 ला निरोप देत, नववर्षाचे स्वागत करणारे हे सोहळे रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळ गाठण्यासाठी वाघूरच्या पाण्यातून बोटीच्या माध्यमातून जावे लागणार आहे. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत वाघूर धरणाच्या बॅक वॉटरवर असलेल्या सुंदर बेटावर हे पर्यटनस्थळ असून तेथेच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Jalgaon : मनपा भंगार चोरी प्रकरणात मोठी अपडेट, 26 डिसेंबरला सुनावणी…