Gramvikas Vibhag : ग्रामविकास विभागाच्या दोन वर्षाचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण….
हॅलो जनता, प्रतिनिधी – गेल्या दोन वर्षापासून ग्रामविकास विभागाच्या (Gramvikas Vibhag) माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या विकासाभिमुख योजना राबविल्या जात आहे. या योजनांची जनतेसह सर्वांना माहिती व्हावी त्याच पद्धतीने गेल्या दोन वर्षात ग्राम विकास विभागाकडून राबविण्यात आलेल्या योजना आणि कामांचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ या पुस्तकाचे विधानभवन, मुंबई येथे अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास विभागाने (Gramvikas Vibhag) मागील दोन वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ या पुस्तकाचे विधानभवन, मुंबई येथे आज अनावरण करण्यात आले.
यावेळी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर उपस्थित होते.
Muktainagar : पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक
बापरे! अमळनेरात आढळला कोब्रा पेक्षा पाचपट विषारी पोवळा जातीचा दुर्मिळ साप