हॅलो शिक्षण

ऐनपूर महाविद्यालयात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐनपूर : कौशल्य विकास आणि श्रमसंस्काराच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्याच्या उद्देशाने जे.पी. टेक फाऊंडेशन, जळगाव, महिला व बालकल्याण विभाग आणि पंचायत समिती, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील समान संधी केंद्रात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा सुरू आहे. कार्यशाळेचे दहा दिवस पूर्ण झाल्यानिमित्त प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या प्रसंगी जे.पी. टेक फाऊंडेशनचे अध्यक्ष जयंत पाटील, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तसेच पंचायत समिती रावेरचे गटविकास अधिकारी विनोद मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

प्रास्ताविकात जयंत पाटील यांनी शासनाच्या कौशल्य विकास उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत महिलांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींची माहिती दिली. गटविकास अधिकारी विनोद मेढे यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले.

रामदास महाजन यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कौशल्यासोबत मेहनतीची जोड देत समाजाभिमुख राहण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. अंजने यांनी महिला सक्षमीकरणासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांनी त्यातून कौशल्य आत्मसात करून स्वतःचा आणि देशाचा विकास साधावा, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक शालिनी मंजुळे, रोशन बगाडे, प्रा. साईनाथ उमरीवाड, प्रा. कोमल सुतार तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत पाटील, श्रेयस पाटील, हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले.

ही कार्यशाळा पुढील महिनाभर सुरू राहणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button