विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील ३८ विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांवर दिलेला भर याचाच परिपाक म्हणून विद्यापीठातील विविध प्रशाळांतील तब्बल ३८ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दिली.
कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की,“विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांवर दिलेला भर तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच प्राध्यापकांनी दिलेले मार्गदर्शन आणि शैक्षणिक वातावरण यामुळे हा निकाल शक्य झाला आहे.” अशी प्रतिक्रिया देत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यापीठातील विविध प्रशाळांतील तब्बल ३८ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण करत विद्यापीठाचा लौकिक वाढविला आहे. SET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, वाणिज्य, कला तसेच इतर प्रशाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशासाठी विद्यापीठाच्या विविध प्रशाळांतील प्राध्यापकांनी सातत्याने अभ्यासमूल्य वर्ग, मार्गदर्शन शिबिरे आणि सराव चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार केले होते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील शिस्तबद्ध अभ्यासक्रम, उत्कृष्ट ग्रंथालय व प्रयोगशाळा सुविधा तसेच प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे यश मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे :
१) संगणक शास्त्र प्रशाळा – पीयूष रविकिरण सावळे, सायली जीवन चौधरी, रोशनी ज्ञानेश्वर भामरे,
२) रसायनशास्त्र प्रशाळा – कुमावत अभय सोमनाथ, मसुळे यश देविदास, सनासं सुप्रिया भागवत, पाटील कामिनी किरण, रावतुला स्नेहा नरेश, बाविस्कर चेतना विजय,
३)गणित शास्त्र प्रशाळा – प्रणिता राणे, शिवाजी राजेंद्र सेलकर, तृप्ती रायपुरकर, प्रियंका नितीन पाटील, श्रद्धा चौधरी, प्राजक्ता दिनेश भोई, सामिया पठाण, प्रणित रमेश सोनवणे, मानसी देशमुख, देवयानी सुनील भोसले
४) संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग – विशाल चव्हाण, चंद्रशेखर काळकर, अंकेश पावरा
५)पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळा – आकाश अजित तडवी, राजेंद्र तायडे, वैष्णवी अजय देसले,
६) शिक्षणशास्त्र प्रशाळा – पावरा बसरा मेरज्या, गावित मोनिका राजेश, वळवी गुलाबसिंग विऱ्या, ठाकरे ज्योती शिवाजी, चव्हाण सोपान ताराचंद, वसावे शंकर खोजल्या,
७) भौतिक शास्त्र प्रशाळा – महाजन हिमानी विकास , पाटील महेश प्रल्हादभाई , पाटील जयेश अवधूत, शिंपी वैभवी अनिल, मालपुरे नेहा निलेश, कृतिका विश्वास पाटील, स्वप्निल तायडे
इतर महत्वाच्या बातम्या….
🛑 जळगाव जिल्ह्यातील सेविका मदतनीसांच्या ग्रॅच्युटीसंदर्भातील बैठक उत्साहात संपन्न
🛑 अभिनेत्रीपासून उद्योजिकेपर्यंत मालविका गायकवाड – एक बहुआयामी प्रवास
🛑 एस टी महामंडळात मोठे भ्रष्टाचार, भ्रष्टाचार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक