विद्यार्थ्यांनो! १२ वी कॉमर्स नंतर काय? हा कोर्स करा आणि हमखास नोकरी मिळवा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव दि. ४ (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये १२ वी नंतर बी कॉम (रिटेल मॅनेजमेंट) या रोजगाराभिमुख अनोख्या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी व व्यवसायक्षम बनवण्याकरीता विद्यापीठातील प्रशाळांमध्ये इयत्ता १२ वी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमांना या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रवेश देण्यास सुरवात झाली आहे. विद्यापीठाच्या वाणिज्य प्रशाळेअंतर्गत बी.कॉम (रिटेल मॅनेजमेंट) या नवीन अत्याधुनिक व उद्योगकेंद्री अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळावे यासाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. जी विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान, कौशल्ये आणि नोकरीच्या संधींमध्ये अधिक सक्षम बनविणारी ठरणार आहे.
यात रिटेल मूलतत्त्वे व धोरणे, ग्राहक-केंद्रित रिटेलिंग, स्टोअर ऑपरेशन्स व व्हिज्युअल मर्चेंडायजिंग, रिटेल अॅनालिटिक्स व तंत्रज्ञान त्यात डेटा अॅनालिटिक्स, पीओएस प्रणाली, सीआरएम टूल्स आणि ई-कॉमर्स, एआय व ओम्नी चॅनल प्लॅटफॉर्म्स सारखी प्रगत रिटेल तंत्रज्ञान साधने वापरून धोरणात्मक निर्णय घेण्यास विद्यार्थी सक्षम बनवणार आहेत. यासह पुरवठा साखळी व विक्रेता व्यवस्थापन व्यावसायिक व नैतिक कौशल्ये आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिटेल संस्थांमध्ये जबाबदारीची भूमिका निभावण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी केली जाणार आहे.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचा 10+2 (उच्च माध्यमिक) परीक्षा किंवा तत्सम समक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्यापीठाच्या माध्यमातून बी. कॉम रिटेल मॅनेजमेंट हा कोर्स करत असताना एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत पेड अप्रेंटिसशिप करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळणार असून या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक खर्च देखील पूर्ण होणार आहे. विद्यापीठाने स्थानिक व राष्ट्रीय रिटेल कंपन्यांसोबत सामंजस्य करार उद्योग क्षेत्राशी प्रत्यक्ष संलग्नता केली आहे. यात जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव, दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँक लि., दिपक मेडिकल्स, अमळनेर, नयनतारा अॅण्ड सन्स, (आर.सी. बाफना ज्वेलर्स), जळगाव, प्रोग्रेसिव्ह ग्रोसर्स एलएलपी (नवजीवन प्लस सुपर शॉप), जळगाव यांचा समावेश आहे.
भारतीय रिटेल क्षेत्र आकाराच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.भारतातील रिटेल क्षेत्र देशाच्या जीडीपीच्या १०% पेक्षा जास्त आणि कामगार संख्येत सुमारे ८% (३५ दशलक्ष) आहे. २०३० पर्यंत २५ दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. २०२६ पर्यंत बाजारपेठेचा आकार १.७५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. संघटित रिटेल प्रवेशातील वाढ अंदाजे १२% असून जगभरात २ दशलक्ष नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी किरकोळ उद्योजक बनू शकतात, ते स्वतःचे रिटेल आउटलेट स्थापन करू शकतात. विद्यार्थी स्टोअर मॅनेजर, ई-कॉमर्स मॅनेजर, सप्लाय चेन मॅनेजर आणि व्हिज्युअल मर्चेंडायझर्स अशा व्यवस्थापकीय पदांवर काम करू शकतात. तसेच सर्व स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये देखील चांगल्या पदावर नोकरी करू शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 पाचोरा गोळीबार : ११ राऊंड फायर, नेमके काय घडले….
💥 ब्रेकिंग : पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी
अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र आयोग आवश्यकच होता – आमदार सत्यजित तांबे