आकाशवाणी चौकातील हॉटेलच्या किचनला आग ; मेडीकल दुकानाचे नुकसान !

हॅलो जनता न्युज, जळगाव :
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमुळे बाजूला असलेल्या मेडीकलच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवित आग आटोक्यात आणली.
शहरातील आकाशवाणी चौकातील तळघरात असलेल्या हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना समजताच, परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांची मदत मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत आग विझवण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर नागरिकांनी परिसरातील दुचाकी आणि इतर वाहने सुरक्षित ठिकाणी हलवली, ज्यामुळे आणखी कोणतेही नुकसान होण्यापासून टळले. घटनेची माहिती मिळताच पोलिस विभाग आणि अग्निशमन दल तात्काळ कारवाईसाठी दाखल झाले. मात्र, पोलीस ठाण्यात अद्याप या प्रकरणी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही, तसेच आगीचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
Jalgaon Crime : घराबाहेर उभी असलेली रिक्षा टवाळखोरांनी पेटविली
धरणगावात बंद घर फोडून चोरी, गुन्हा दाखल !
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टिका, ईडी चौकशीची मागणी