Jalgaon : वातावरण बदलामुळे व्हायरलचे रुग्ण वाढले ; बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर
हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon
Jalgaon : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर गेली आहे.
खासगी रुग्णालयांमध्येही ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण व्हायरल इन्फेक्शनचे आढळत आहेत. या संसर्गामुळे ताप, सर्दी आणि खोकल्यासारखी लक्षणे आठवड्याभरापेक्षा अधिक काळ टिकत असल्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला व ताप याचे प्रमाण वाढले आहे.
Jalgaon : रुग्णांनी मास्क वापरावा
पावसाळ्यामुळे सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, स्वतःची व इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णांनी मास्कचा वापर करावा, तसेच फक्त उकळलेले पाणी प्यावे, असा सल्ला जीएमसीचे डॉ. भाऊराव नाखले यांनी दिला आहे.
Weather Update : जळगाव, धुळेसह या जिल्ह्यात 3 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार