Rajumama bhole : मुख्य सूत्रधार अद्याप फरार, आमदार भोळेंची पोलिसांवर कारवाईची मागणी”
![](https://hellojanata.com/wp-content/uploads/2024/12/Rajumama-Bhole-_20241222_112400_0000-780x470.jpg)
हॅलो जनता, जळगाव : Rajumama bhole
महापालिकेच्या गिरणा पंपिंग केंद्रातील पाइपलाइन चोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, त्याला पोलिस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश भोळे (Rajumama bhole) यांनी केला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा करत भोळे यांनी संबंधित पोलिस अधिकारी व इतर सहभागी व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली.
गिरणा पंपिंग केंद्रातील सुमारे १२६० मीटर पाइपलाइन चोरी प्रकरणाने शहरात आधीच खळबळ उडवली होती, मात्र आता हे प्रकरण विधानसभेत पोहोचले आहे. आमदार भोळे यांनी अधिवेशनात मनपातील पदाधिकाऱ्यांसह पोलिसांवरही संगनमताचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपींची नावे समोर आल्याला पंधरा दिवस झाले असून काहींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार सुनील महाजन अजूनही फरार आहे.
पंधरा दिवसांपासून मुख्य सूत्रधारालाच पोलीस घालत आहे पाठीशी
भोळे यांनी आरोप केला की, पंधरा दिवसांपासून पोलिस मुख्य सूत्रधाराला पाठीशी घालत असून, त्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. भोळे यांनी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा यांच्यावरही टीका करत सांगितले की, त्यांनी एफआयरमध्ये सुनील महाजनचे नाव खाडाखोड करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी व दोषींवर कठोर कारवाईसाठी अधिवेशनात त्यांनी जोरदार मागणी केली आहे. तसेच, भ्रष्टाचार व कटात सहभागी असणाऱ्यांवरही कठोर पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.
Jalgaon Chori : निमखेडी शिवारातील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला !
Dainik Deshdoot : “दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांचे ९२व्या वर्षी निधन”