Makarsankranti 2025 : “संक्रांतीच्या आधीच तीळ खरेदी करा; भाव गगनाला भिडणार!”
हॅलो जनता, जळगाव : Makarsankranti 2025
मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. मात्र, सर्वत्र वाढत्या महागाईचा परिणाम सणांवरही होताना दिसत आहे. येत्या काही आठवड्यांत साजऱ्या होणाऱ्या संक्रांतीच्या सणासाठी लागणाऱ्या तिळगुळाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गूळ आणि साखरेचे दर तुलनेने स्थिर आहेत, पण तिळाला वाढती मागणी लक्षात घेता त्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
Makarsankranti 2025 : यंदा तीळगूळ महागणार !
मागील वर्षी तिळा आणि गुळाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे तीळ व हलव्याच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली होती. यंदा साखर व गुळाचे दर तुलनेने कमी असले तरी तिळाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही तीळगुळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी २६०; यंदा २३०
संक्रांत सणाला तिळाच्या पदार्थाचे खूप महत्त्व आहे. बाजारपेठेत सध्या तीळ आणि तिळापासून तयार होणारे पदार्थाचे दर वाढले आहेत. सध्या तिळाचे भाव किरकोळ बाजारात १६० ते २३० रुपये किलो आहेत. मागील वर्षी १८० ते २६० रुपये प्रतिकिलो रुपये असे होते. तर यंदा संक्रांती पर्यंत २५० रुपयांपर्यंत तिळाचे दर जाण्याची शक्यता आहे.
गुळाचे दर यंदा स्थिर
दिवाळी तसेच हिवाळ्यात गुळाचे दर मागील वर्षापेक्षा कमी आहेत. मागील वर्षी गूळ ५० रुपये ते ७५ रुपयांपर्यंत मिळत होता. आता १ किलो गुळाची भेली ४५ ते ६५ रुपयांपर्यंत मिळत असून दर स्थिर आहेत.
तिळाचे उत्पादन घटल्याचा परिणाम
मागील काही वर्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या वातावरण बदलाचा तिळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. उत्पादनात घट आल्याने तिळाचे भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मकर संक्रांतीला तिळाच्या बाजारपेठेत मागणीत वाढ झाल्याने तिळाचे भाव वाढल्याचे तीळगूळ विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
तीळ अन् गुळाची खरेदी आताच परवडली !
मकर संक्रांतीसाठी तीळगूळ तयार करण्यासाठी नागरिकांना आतापासूनच तिळाची खरेदी करणे फायदेशीर राहणार आहे. सध्या तीळ बाजारात १६० ते २३० रुपयापर्यंत आहे, अशी माहिती विक्रेते सचिन छाजेड यांनी दिली.
Jalgaon Crime : धक्कादायक : ११ महिन्यात तब्बल ३०४ अल्पवयीन मुली रफुचक्कर…
ब्रेकिंग : वाळू माफियांचा मध्यरात्री महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला, एक तलाठी गंभीर जखमी…