अंजली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, गरिबांची दिवाळी केली गोड…
हॅलो जनता न्यूज, पाचोरा
पाचोरा तालुक्यातील गाळण या गावात अंजली फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. याच माध्यमातून दिवाळीनिमित्त समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दिवाळीनिमित्त साडी आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या सणासुदीच्या काळात घरोघरी दिवाळी ही अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अंजली फाउंडेशन तर्फे हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. बिजयसिंग बाबूसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सचिन हिलाल पाटील, सचिव सरिता बिजयसिंग राजपूत, सदस्या रत्नाबाई ओंकार पाटील, लक्ष्माबाई विक्रम सावंत, स्नेहल नितीन राजपूत, सदस्य भीमराव सीताराम पाटील, करणसिंग कैलाससिंग राजपूत तसेच सर्व संचालक मंडळाच्या हस्ते फराळ व भेटवस्तू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शीतलताई पाटील पाचोरा, योगेंद्रसिंग भोजूसिंग पवार, पंकज योगेंद्रसिंग पवार, विवेक पाटील धुळे यांच्यासह राजेंद्र काशिनाथ गायकवाड , ईश्वर भीमराव पाटील , केशव आधार देवरे, राजेंद्र संतोष शेलार व ऋषिकेश भीकन तुपे ,भैरवसिंग भुपेंद्रसिंग राजपुत, सुनील पवार यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्त्यूत कार्यक्रमाचे सचिन हिलाल पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले,डॉ.बिजयसिंग बाबूसिंग राजपुत व श्रीमती सरिता बिजयसिंग राजपूत यांनी मनोगत व्यक्त करत भविष्यात देखील पंचक्रोशीतील गरजूंना अंजली फाऊंडेशन मार्फत असेच सामाजिक उपक्रम राबविण्याच्या भावना व्यक्त केल्या. केशव आधार देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
इतर महत्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर पाटील यांना जाहीर पाठिंबा…..
आईसाठी लेकी मैदानात, वैशाली सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…
ब्रेकिंग : आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तीन तक्रारी….