विधानसभा २०२४

कुणी उमेदवार देत का उमेदवार ! जळगाव ग्रामीण मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडेना…

हॅलो जनता न्युज, धरणगाव –

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांना जाहीर केली आहे. आज मोठं शक्ती प्रदर्शन करत गुलाबराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अजून उमेदवार सापडत नसल्याने अजून देखील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. जळगाव ग्रामीण मतदार संघात पालकमंत्री म्हणून प्रचंड विकास कामे झाले असून गुलाबराव पाटीलांचे मतदार संघात ‘वजन’ नक्कीच वाढलं असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अद्याप ‘तगडा’ उमेदवार मिळत नसल्याने जळगाव ग्रामीण मतदार संघात चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून काहींनी ‘देव पाण्यात’ ठेवले आहे मात्र अद्याप ‘देव’ काही पावत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ठाकरेंच्या सेनेकडून निष्ठावंत कार्यकर्त्याला जळगाव ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान देण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून होत आहे. त्यामुळे या रस्सीखेच मध्ये अजून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार फिक्स होत नसल्याचे समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील आज दिनांक २४ रोजी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप तरी ठरलेला नसल्याने मतदार संघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहे.

जळगाव ग्रामीण महायुतीची प्रचारात आघाडी…

एकीकडे महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार मिळाला नाही तर दुसरीकडे महायुतीचे संवाद मेळावे सुरू झाले असून गावोगावी भेटी देत प्रचारात व निवडणुकीची रणनीती आखण्यात महायुतीला यश आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असल्याने महाविकास आघाडी जळगाव ग्रामीण मतदार संघाचा तिढा लवकरच सोडवेल आणि आपला उमेदवार जाहीर करून ‘काट्या’ची टक्कर देतील का हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

पाचोऱ्यातून वैशाली सुर्यवंशी याच महाविकास आघाडीच्या उमेदवार, ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी जाहीर…

ब्रेकिंग: शिंदे सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर, जळगाव जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना डच्चू….

पंचनाम्याचे नाटक बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा, वैशाली सुर्यवंशी मागणी…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button