शिंदेच्या आमदाराची पुन्हा जीभ घसरली, संभाजीराजे आणि शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप

हॅलो जनता न्यूज, मुंबई :- ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे, शिवाजी महाराज आणि स्त्री नेतृत्वाच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींविषयी बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, “संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?” अशा प्रकारचा सवाल करत त्यांनी भाषिक कौशल्यावर भर दिला. “फक्त हिंदी नव्हे, जगात टिकायचं असेल तर अनेक भाषा शिकाव्या लागतात. शिवाजी महाराज, जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सगळे लोक काही मूर्ख होते का?” असा दावा करत त्यांनी बहुभाषिकतेचं समर्थन केलं.
परंतु, या वक्तव्याच्या ओघात त्यांनी “मूर्ख” हा शब्द वापरल्याने छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांचा अवमान झाल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. सामाजिक माध्यमांवर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार याविषयी बोलताना गायकवाड यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही टीका करताना, “हा फार उशीर झालेला निर्णय आहे. ठाकरे ब्रँडमध्ये आता काही दम राहिलेला नाही,” असं म्हटलं. त्यांनी असंही स्पष्ट केलं की, “बाळासाहेब ठाकरेंच्या काळातसुद्धा शिवसेना कधीच ७०-७४ जागांच्या वर गेली नाही. २८८ जागांवर विजय मिळवणं केवळ ब्रँडमुळे शक्य नाही,” असा टोला लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या….
आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त चिनावल वारकरी भक्त निवास मंडपाचे भव्य लोकार्पण
💥 ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात, पहाटे पुलाचे बॅरिकेट तोडून बस नदीत कोसळली.